भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईंल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज

hoinl to bhog bhogin apula | na ghalin viththala bhar tuj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होईंल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥१॥ तुम्हांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥ नये काकुलती गर्भवासांसाठी । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥२॥ तुका म्हणे मज उदंड एवढें । नाचेन मी पुढें मायबापा ॥३॥