भजनी मालिका
← भजनांकडे परत

होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन

hoin khade gote | charanaraj sane mothe | pandhariche vate | santacharanin lagen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥१॥ आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । आठविता सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥ होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥२॥ सांडोवा पायरी । वोहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥३॥ लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका म्हणे देई । धाक नाहीं जन्माचा ॥४॥