भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें

hoil tari pusapusi | uttar tyasi yojaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होईल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥१॥ तोंवरी मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥ जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥२॥ तुका म्हणे धरिल हातीं । करील खंती वेगळें ॥३॥