भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां

hoil nirop ghetala yavari | raulabhitarin jauniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां ॥१॥ करूनियां दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्तें ॥ध्रु.॥ होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥२॥ येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधान होतीं संतीं ॥३॥ तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परतोंनी ॥४॥