भजनी मालिका
← भजनांकडे परत

हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी

ho kan durachari | vache nam jo uchchari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥ त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥ नसो भाव चित्तीं । हरीचे गुण गातां गीतीं ॥२॥ करी अनाचार । वाचे हरीनामउच्चार ॥३॥ हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥४॥ म्हणवी हरीचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥५॥