भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार

henhi aisen ten hi aisen | ubhay pisen avichar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हेंही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥ अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं झाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥ धीरा शांती ठाव नुरे । हाचि उरे आबाळ्या ॥२॥ कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधणीं ॥३॥