भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर

hen chi varanvar | padataluni uttar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥ करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥ गंगोदकें गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥२॥ जोडोनियां हात । करी तुका प्रणिपात ॥३॥