भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां

hen chi sarvamukh japava viththal | na davadava pal kshan vanyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥ हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥ न लगती कांहीं तपांचिया रासी । करणें वाराणसी नाना तीर्थे ॥२॥ कल्पना हे तिळ देहीं अभिमान । नये नारायण जवळी त्यांच्या ॥३॥ तुका म्हणे नामें देव नेदी भेटी । म्हणे त्याचे होंटी कुष्ट होय ॥४॥