भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेचि माझें चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी

hechi majhen chitti | raho ata bhavapriti | viththal sushupti | jagruti svapnasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हेचि माझें चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी ॥१॥ आणिक नाही मागणें । राज्यचाड संपत्ती धनें । जिव्हे सुख तेणें । घेता देई नाम तुझे ॥ध्रु.॥ तुझें रूप सर्वाठायी । देखे ऐसे प्रमे देई । ठेवावा पायी । अनुभव चित्ताचा ॥२॥ जन्ममरणाचा बाध । समूळूनि तुटो कंद । लागो हाची छंद । हरी गोविंद वाचेसी ॥३॥ कायापालटे दर्शनें । अवघे कोंदाटे चैतन्य । जीवशिवखंडण । होय तरे चिंतिता ॥४॥ तुका म्हणे याची भावे । आम्ही धालो तुझ्या नांवे । सुख होत जन्मे । भलतेयाती भलतैसी ॥५॥