भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातीं घेऊनियां काठी । तुका लागला कलेवरा पाठी

hatin gheuniyan kathi | tuka lagala kalevara pathi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हातीं घेऊनियां काठी । तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥ नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥ काढिलें तें ओढें । मागील उपचाराचें पुढें ॥२॥ नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥ याजसाठी हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥४॥ तुका म्हणे अनुभव बरा । नाहीं तरी हस्त पाय चोरा ॥५॥