भजनी मालिका
← भजनांकडे परत

हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी

hasoniya radha bole yashodeshi | yah o ha chor bol vishvasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी ॥१॥ आण वाहतसे लटकीची मामिसे । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥ खोडी न करी ऐशी वाहे तू आण । गोरसांवांचुनि चोरी न करीं तुझी आण ॥३॥ एका जनार्दनीं बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणीं ॥४॥