भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिस्मरणीं सावध व्हावें । स्वहित आपुलें विचारावें

harismaranin savadh vhaven | svahit apulen vicharaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिस्मरणीं सावध व्हावें । स्वहित आपुलें विचारावें ॥१॥ तरला प्रल्हाद आणि धुरु । उपमन्यु क्षीरसागरु ॥२॥ एका जनार्दनीं छंद । अवघा भरला श्रीगोविंद ॥३॥