भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं

harikathe nahin | vishvas jyache thayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥ त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥ सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥ तुका म्हणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥३॥