भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिहरं भेद । नका करुं अनुवाद । धरितां रे भेद । अधम तो जाणिजे

hariharan bhed | naka karun anuvad | dharitan re bhed | adham to janije

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिहरं भेद । नका करुं अनुवाद । धरितां रे भेद । अधम तो जाणिजे ॥१॥ वैष्णव निका संभ्रम । महादेव सर्वोत्तम । द्वैताचा भ्रम । धरुं नको ॥२॥ आदिनाथ परंपरा । चालत आली तो पसारा । जनार्दनें निर्धारा । उघडे केलें ॥३॥ गुह्मा जाप्य शिवांचें । उघडें केलें पां साचें । एका जनार्दनीं वाचे । रामनाम ॥४॥