भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीचे नामें हरीचे भक्त । उद्धरले असंख्यात

hariche namen hariche bhakta | uddharale asankhyat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरीचे नामें हरीचे भक्त । उद्धरले असंख्यात ॥१॥ दैत्य दानव मानव । रीस वानर जीव सर्व ॥२॥ वृक्ष पाषाणादि तृण । हरिनामें ते पावन ॥३॥ पशु पक्षी अबला । एका जनार्दनीं तरल्या ॥४॥