भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची

hari taise hariche das | nahin tayan bhay moh chinta as| houni rahati udas | balakat kans bhaktichi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरी तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥ धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लागे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥ वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गि†हे राबवीती ॥२॥ बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥३॥ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रिद्धीसिद्धी देशटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥४॥ जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥५॥