भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी म्हणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरी म्हणतां

hari mhanatan gati pataken nasati | kilakal kampati hari mhanatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरी म्हणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरी म्हणतां ॥१॥ हरी म्हणतां भुक्ती हरी म्हणतां मुक्ती । चुके यातायाती हरी म्हणतां ॥ध्रु.॥ तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरी म्हणतां ॥२॥ तुका म्हणे भावें जपा हरीचें नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥३॥