भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी

hakesarisi udi | ghaluniyan stambh phodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥ करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥ तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥