भजनी मालिका
← भजनांकडे परत

हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी

hagatan hi khodi | chalan modaviten kadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥ ऐसे अनावर गुण । आवरावे काय ह्मुण ॥ध्रु.॥ नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥ तुका म्हणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥