भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे

hachi paramanand alangin bahin | kshem detan thayin dvait tute

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥ बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥ जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥२॥ तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥ तुका म्हणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥४॥