भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी

gulen makhoniyan dagad thevila | var dise bhala lokachari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥ अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥ ऐसिया दांभिकां कैची हरीसेवा । नेणे चि सद्भावा कोणे काळीं ॥२॥ तुका म्हणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥३॥