भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोरियाच्या वाडा संत प्रवेशले । गोरियाने देखिले दृष्टीं सर्व

goriyachya vada sant praveshale | goriyane dekhile drushtin sarva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोरियाच्या वाडा संत प्रवेशले । गोरियाने देखिले दृष्टीं सर्व ॥१॥ देउनी आसन बैसविलें संतां । तंव ज्ञानदेव पुढतां होउनी बोले ॥२॥ कर ते तुटले प्रपंच चाले कवणे परी । येरु म्हणे वांटेकरी पंढरीचा ॥३॥ ज्ञानदेव म्हणती तयासी बोलवा । तंव ते लगबगा धांवे कांता ॥४॥ स्त्रियेसहित नाहीं तेथें कुंभकार विठा । एका जनार्दनीं वांटा गेला कवणें ॥५॥