भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें

gopika tya bol bolati avadi | ekatati gadi sambhovaten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें ॥१॥ सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥ गोपिका कामातुर त्या मनीं । जाणोनि चक्रपाणी रास खेळे ॥३॥ षण्मास खेळ खेळती अबला । एका जनार्दनीं कळा न कळे कोण्हा ॥४॥