भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं

gopi dhavuniyan dhariti tayatan | uga pahe bahaten na bole kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥ करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥ कां रें चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥ वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥ एका जनार्दनी यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥