भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळपुरीं काला गोपाळ करिती । तेथील लाभा देव लाळ घोटिती

gopalapurin kala gopal kariti | tethil labha dev lal ghotiti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोपाळपुरीं काला गोपाळ करिती । तेथील लाभा देव लाळ घोटिती ॥१॥ ऐसा आनंड गे माय तया पंढरपुरी । धन्य भक्त देवंचे वारकरी ॥२॥ आषाढी कार्तिकी नित्य नेमें जाण । जाउनी भीवरे करिताती स्नान ॥३॥ घेतां दरुशन पुंडलिकाचे भेटी । एका जनार्दनी पुण्य न समाये सृष्टी ॥४॥