भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळ गौळणी शोभती त्या मुर्ती । तें सुख परिक्षिती संतजन

gopal gaulani shobhati tya murti | ten sukh parikshiti santajan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोपाळ गौळणी शोभती त्या मुर्ती । तें सुख परिक्षिती संतजन ॥१॥ ऐसें अपरंपार भक्त ते असती । स्वयेंचि श्रीपती दावितसे ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा तो मेळ । दावीत सकळ वैभव हरिभक्तां ॥३॥