भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोमटीं गोजिरी पाउलें साजिरीं । कटी मिरविली करें दोन्हीं

gomatin gojiri paulen sajirin | kati miravili karen donhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोमटीं गोजिरी पाउलें साजिरीं । कटी मिरविली करें दोन्हीं ॥१॥ वामभागी शोभे भीमकतनया । राही सत्यभामा या जीवलगा ॥२॥ गरुड हनुमंत जोडलें ते करी । उभे महाद्वारी भक्तजन ॥३॥ एका जनार्दनीं आनंदे भक्तांचा । जयजयकार साचा विठ्ठलनामें ॥४॥