भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोमटया बीजाचीं फळें ही गोमटीं । वाहे तें चि पोटीं समतुक

gomataya bijachin phalen hi gomatin | vahe ten chi potin samatuk

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोमटया बीजाचीं फळें ही गोमटीं । वाहे तें चि पोटीं समतुक ॥१॥ जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥ खऱ्याचे पारखीं येत नाहीं तोटा । निवडे तो खोटा ढाळें दुरी ॥२॥ तुका म्हणे मज सत्याचि आवडी । करितां तांतडी येत नाहीं ॥३॥