भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व

gokulichya jana dhyan | vache mhanati krushna krushna | jevitan baisatan dhyan | krushnamay sarva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥ ध्यानी ध्यती कृष्णा । आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥ घेतां देतां वदनीं कृष्ण । आनं नाहीं कांही मन । वाचा वाच्य वाचक कृष्ण । जीवेंभावें सर्वदा ॥३॥ कृष्णारुपीं वेधली वृत्तीं । नाहीं देहाची पालट स्थितीं । एका जनार्दनी देखती । जागृती स्वप्नी कृष्णांतें ॥४॥