भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो

gokuli gopalasaven khelatase dev | aik premabhav tayancha to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥ गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥ सवंगडियांचे मेळी खेले वनमाळी । घोंगडी ते काळी हातीं काठी ॥३॥ त्रैलोक्यांच्या धनीं वाजवी मुरली । भुलवी गौळणी प्रेमभावें ॥४॥ घरोघरीं चोरी करितो आदरें । एका जनार्दनीं पुरे इच्छा त्यांची ॥५॥