भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा

gheuniyan parivara | ala ase pandharapura

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥ भक्तां पुंडलिकासाठी । उभा ठेवुनी कर कटीं ॥२॥ केशर कस्तुरी चंदन टिळा । कांसे शोभें सोनसळा ॥३॥ वामांकी शोभे रुक्मिणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥