भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊनि लवलाही गृहासी ती आली । मनी संतोषली आनंदभरित

gheuni lavalahi gruhasi ti ali | mani santoshali anandabharit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घेऊनि लवलाही गृहासी ती आली । मनी संतोषली आनंदभरित ॥१॥ पतीसी तत्वंता दिले तें पृथक । बांधावला वस्त्र धड नाहीं ॥२॥ शत एक ग्रंथी वस्त्रासी बांधोनी । निघाला तेथोनि झडझडा ॥३॥ पतिव्रता बोले लवकरी यावें । एका जनार्दनीं बरबों म्हणोनि निघे ॥४॥