भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां

gheuni kapad nighe bajarasin | athavi devasi velovelan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥ व्यापार तो कैंचा मज नाहीं ठावा । काय वो केशवा करुं आतां ॥२॥ माझी हे फ़जितीं होईल पांडुरंगा । काय या प्रसंगा करुं जातां ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा नामा कष्टी । होऊनी हिंपुटी चालिलासे ॥४॥