भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेसी तरी घेई संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना

ghesi tari ghei santachi bheti | anik te goshti nako mana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घेसी तरी घेई संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥ सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥ करिसील तो करीं संतांचा सांगात । आणीक ते मात नको मना ॥२॥ बैससील तरी बैस संतांमधीं । आणीक ते बुद्धी नको मना ॥३॥ जासी तरि जाई संतांचिया गांवां । होईल विसावा तेथें मना ॥४॥ तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेई ॥५॥