भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी

gharoghari krushna dharila bobhata | gheuni yeti dhita rajadvari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥ पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२ गोपिका धांवती घेऊनियां कृष्ण । न कळे विंदान कांहीं केल्या ॥३॥ घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनीं ॥४॥ एका जनार्दनींदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिकां ॥५॥