भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरचा वृत्तांत पाहुनी नयनीं । नामा तेचि क्षणीं राउळीं गेला

gharacha vruttant pahuni nayanin | nama techi kshanin raulin gela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घरचा वृत्तांत पाहुनी नयनीं । नामा तेचि क्षणीं राउळीं गेला ॥१॥ पायांवर भाळ ठेवुनी तत्वतां । म्हणे पंढरीनाथ सांभाळिलें ॥२॥ जन्माचा पोसणा दास तुझा दीन । तें त्वां वचन सत्य केलें ॥३॥ एका जनार्दनीं दासाचें धांवणें । देवाविण कोण करील तें ॥४॥