भजनी मालिका
← भजनांकडे परत

घर सोडोनि जावें परदेशा । मजसवें देव सरिसा

ghar sodoni javen paradesha | majasaven dev sarisa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घर सोडोनि जावें परदेशा । मजसवें देव सरिसा ॥१॥ कडे कपाटे सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरी ॥२॥ आतां कोणीकडे जावें । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥ एका बैसला निरंजनीं । न जाइजे जनीं वनीं ॥४॥