भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं

gela kothen hota kothuniyan ala | sahaj vyapala ahe nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥ आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥ कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें झालें ॥३॥ जातों येतों आम्ही देवाचे सांगांतें । तुका म्हणे गात देवनाम ॥४॥