भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेला आपुल्या गृहाप्रती । बाळ तो निद्रा न करी रात्रीं । क्षुधा लागलीसे बहुती । मागे दूधभात जेवाया

gela apulya gruhaprati | bal to nidra na kari ratrin | kshudha lagalise bahuti | mage dudhabhat jevaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गेला आपुल्या गृहाप्रती । बाळ तो निद्रा न करी रात्रीं । क्षुधा लागलीसे बहुती । मागे दूधभात जेवाया ॥१॥ पुढें ती करड्या वांटुनी । काढिले शुभ्रपाणी । येरें टाकिलें थुंकोनी । म्हणे माते कालीचें नव्हे ॥२॥ बारे त्या समर्थाचे घरीं । देवें दिधली दूध क्षीरी । आम्हां दुष्कृताचे घरीं । तें कैंचे रे बाळका ॥३॥ कोठें आहे तो श्रीहरी । दाखवी मज निर्धारी । एका जनार्दनीं परी । ध्यान लागलें हरीचें ॥४॥