भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायत्री मंत्राचा मानुनी कंटाळा । जाय तो वेताळा पूजावया

gayatri mantracha manuni kantala | jay to vetala pujavaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गायत्री मंत्राचा मानुनी कंटाळा । जाय तो वेताळा पूजावया ॥१॥ देवाचें पूजन करितां वाटे दुःख । आवडीं देख भांग घोटी ॥२॥ ब्राह्मणासी पाणी देतां मानीं शीण । वेश्येचें धूवण वस्त्रें धूई ॥३॥ कीर्तनीं बैसतां म्हणे निद्रा येत ।खेळतसे द्यूत अहोरात्रीं ॥४॥ पुराण श्रवणीं मानीत कंटाळा । नटनाट्य खेळा पाहों जाय ॥५॥ एका जनार्दनीं ऐसा तो गव्हार । चंद्रअर्कवर नरक भोगी ॥६॥