भजनी मालिका
← भजनांकडे परत

गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त

gave mhanauni git | dharuni rahe taisen chitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥१॥ हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥ ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥२॥ तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥३॥