भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा

gaun nenen pari mi kanhin gain | sharan jain panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥ ब्रम्हांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥ वेश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं ॥२॥ चरणींच्या रजें अहिल्या तारिली । रूपवंत केली कुबजा दासी ॥३॥ पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥४॥