भजनी मालिका
← भजनांकडे परत

गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं

gaton bhav nahin angin | bhushan karavaya jagin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥ परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥ मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥२॥ तुका म्हणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥