भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरी

gati onvya kamen karitan sakalen | halavitan balen devavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरी ॥१॥ ॠद्धिसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपत्ति सर्वां घरीं ॥२॥ घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥ नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥४॥ गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका म्हणे ॥५॥