भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाठीं बांधोनियां धना । क्षणाक्षणा पाहे त्यातें

gathin bandhoniyan dhana | kshanakshana pahe tyaten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गाठीं बांधोनियां धना । क्षणाक्षणा पाहे त्यातें ॥१॥ न जाय तीर्थयात्रेप्रती । धनाशा चित्तीं धरूनी ॥२॥ बैसलासे सर्प दारीं । तैशापरी धुसधुसी ॥३॥ नको धनाशा मजशी जाण । शरण एका जनार्दन ॥४॥