भजनी मालिका
← भजनांकडे परत

गरुडाचे पायीं

garudache payin

गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥ वेगी आणावा तो हरी । मज दीनाते उद्धारीं ॥ध्रु.॥ पाय लक्ष्मीच्या हातीं । म्हणोन येतो काकुलती ॥२॥ तुका म्हणे शेषा । जागें करा हृषीकेशा ॥३॥