भजनी मालिका
← भजनांकडे परत

गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी

gantholis dhan bhakavi karuna | davuni sajjana kinv pidi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥१॥ नाठेळाची भक्ती कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ध्रु.॥ सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥२॥ तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धिंदधिंद सिंदळीचे ॥३॥