भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं

gangechiya antavin kay chad | apulen ten kod trushepashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥ विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥ कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥२॥ बाळाचे सोईतें घांस घाली माता । आटाहास चित्ता नाहीं तया ॥३॥ गाऊं नाचों करूं आनंदसोहळा । भाव चि आगळा नाहीं हातां ॥४॥ तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥५॥