भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती

ganga sagaradi tirthe bhumivari | pari pandharichi sari na pavati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती ॥१॥ श्रेष्ठांमांजी श्रेष्ठ तीर्थ पं समर्थ । दरुशनें मनोरथ पूर्ण होती ॥२॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसे वैष्णव देखे नाही कोठें ॥३॥ गाताती वैष्णव आनंदें नाचती । सदोदित कीर्ति विठ्ठलाची ॥४॥ एका जनार्दनीं पंढरीचा हाट । भूवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥५॥