भजनी मालिका
← भजनांकडे परत

गजाचें तें वोझें गाढवासी न साजे । भाविकाचे भजन अभाविका न विराजे

gajachen ten vojhen gadhavasi na saje | bhavikache bhajan abhavika na viraje

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गजाचें तें वोझें गाढवासी न साजे । भाविकाचे भजन अभाविका न विराजे ॥१॥ पतिव्रतेची रहाटी सिंदळीसी न साजे । श्रोतियाचें कर्म हिंसक लाजे ॥२॥ एका जनार्दनीं कवित्व सर्वांसी साजे । वाचे श्रीगुरु म्हणतो कदा न लाजे ॥३॥